अहमदनगर
राहुरी पालिकेचे मुख्याधिकारी बांगर यांचा सत्कार
राहुरी पालिकेचे मुख्याधिकारी बांगर यांचा सत्कार करताना विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, नगराध्यक्ष अनिल कासार, अशोक आहेर, शहाजी ठाकूर, अक्षय तनपुरे आदी.
राहुरी प्रतिनिधी : राहुरी नगरपालिकेत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी सचिन बांगर यांनी राहुरी पालिकेचा पदभार स्वीकारला आहे.
यावेळी बांगर यांचा राहुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, नगराध्यक्ष अनिल कासार, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उंडे, नगरसेवक अशोक आहेर, शहाजी ठाकूर, सोन्याबापू जगधने, अक्षय तनपुरे, नंदू तनपुरे, पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानदेव निमसे आदींनी सत्कार करत स्वागत केले. नुकतेच श्रीनिवास कुरे यांची नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्या जागेवर संगमनेर येथील सचिन बांगर यांनी राहुरी पालिकेचा पदभार स्वीकारला आहे. श्रीनिवास कुरे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये राहुरीत चांगल्या प्रकारे काम केले आहे. तर नव्यानेच संगमनेर इथून आलेले सचिन बांगर हे कशा प्रकारे राहुरी शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.