अहमदनगर

प्रिया झीने हिची उच्च शिक्षणासाठी अमेरीकेला निवड

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : कु. प्रिया राजुसाहेब झिने हिची वेस्टन मिशिगन युनिव्हर्सिटी अमेरिका येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. तिचे नर्सरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण डी पाँल इंग्लिश मिडीयम स्कूल श्रीरामपूर येथे झालेले असुन इंजिनिअरिंगची पदवी एम आय टी काँलेज पुणे येथुन मिळविलेली आहे.

    तिने अनेक परीक्षांमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल अमेरिकेतील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी मध्ये तिला पुढील शिक्षणाची संधी मिळालेली आहे. खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकर येथील जेष्ठ शिक्षक राजुसाहेब झिने व सौ. शारदा झिने यांची ती कन्या आहे. तिच्या या निवडीबद्दल संस्थेचे सचिव अविनाश आदिक, लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ बबनराव आदिक, सहसचिव अँड.जयंत चौधरी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य हंसराज आदिक व संस्थेतील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षिका यांनीही कु.प्रिया हिचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button