अहमदनगर
प्रा.प्रविण गायकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर यांना महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पुरस्कार २०२०-२१ जाहिर करण्यात आला आहे
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : केंद्र शासनाच्या पद्धतीवर आधारीत राज्यस्तरावर राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत पुरस्कार देण्याची प्रथा सन १९९३-९४ वर्षापासुन सुरु करण्यात आली. त्यानुसार, महाराष्ट्रातील विद्यापीठांकडून प्रस्ताव मागवण्यात आले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यामध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर यांना महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय कार्यक्रम अधिकारी प्रशंसा पुरस्कार २०२०-२१ जाहिर करण्यात आला आहे. प्रा. प्रविण गायकर यांनी शैक्षणिक कार्यक्रमांसोबतच समाजपयोगी कार्यातून विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबविले. त्यांच्या या कार्यासाठी महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पुरस्कार प्रा. प्रविण गायकर यांना जाहिर करण्यात आला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत कुमार पाटील, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील, जि.प.मा.अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे यांनी प्रा. प्रविण गायकर यांस शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यापीठ अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, विद्यापीठ कुलसचिव प्रमोद लहाळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ.देसाई, महाराष्ट्र आणि गोवा रिजनल डायरेक्टर डॉ. कार्तीकेयन, मफुकृवि राहुरी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महावीरसिंग चौहान, अजय शिंदे, माजी राज्य संपर्क प्रमुख डॉ.अतुल साळुंके, आणि कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
सदर प्रसंगी प्रा.प्रविण गायकर यांनी विविध उपक्रम राबविण्यास सहकार्य केल्याबद्दल महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, स्वयंसेवक आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थेच्या सर्व व्यवस्थापन मंडळाचे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी यांचे तसेच पुरस्कार प्रस्तावास मार्गदर्शन व सहकार्य आणि निवड समितीचे आभार मानले.