अहमदनगर
गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकर येथे स्वातंत्र्यदिन साजरा
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकर या विद्यालयात ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण पंचायत समिती श्रीरामपूरचे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांच्या हस्ते संपन्न झाले.
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच राष्ट्राभिमान बाळगुन देशसेवेचे व्रत हाती घ्यावे असे दिवे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.आशाबाई चक्रनारायण होत्या. प्रा.डॉ.शैलेंद्र भगणे यांनी शाळेला संरक्षक भिंत बांधून दिल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापिका सौ.मंदाकिनी खाजेकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. शालेय परिसरात यावेळी पाहुण्यांच्या व ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
याप्रसंगी जेष्ठ नेते बाबासाहेब काळे, माजी सरपंच राम पटारे, हुसेनभाई सय्यद, लक्ष्मणराव चव्हाण, सरपंच सौ.आशाबाई चक्रनारायण, उपसरपंच दिपक काळे, ग्रामपंचायत सदस्य आबा पवार, गणेश सलालकर, महेश पटारे, अमिन सय्यद, तान्हाजी दळवी, राजू चक्रनारायण, सोसायटीचे चेअरमन रेवननाथ भणगे, समीर शेख, पोलीस पाटील डॉ.अनिकेत चव्हाण, राजेंद्र सलालकर, राम भारस्कर, अविनाश शेरकर, भालचंद्र भणगे, आरोग्य अधिकारी डॉ.सौ.संदोरे, शिला गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम.संगीता फासाटे यांनी केले व राजु झिने यांनी सर्वांचे आभार मानले. क्रीडाशिक्षक सुभाष काळे यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.