सामाजिक

श्री क्षेत्र सरला बेट येथील १७४ वा अखंड हरीनाम सप्ताहास ५१ हजारांची देणगी

श्रीरामपूर प्रतिनिधी : श्री क्षेत्र सरला बेट येथील १७४ वा अखंड हरीनाम सप्ताहानिमित्त आमदार लहुजी कानडे व उपनगराध्यक्ष करणदादा ससाणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटी व मा.आ.स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळ यांच्या वतीने ५१,००० रुपयांची देणगी देण्यात आली. यामध्ये उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, नगरसेवक रितेश रोटे, श्रीनिवास बिहानी, दिलीप नागरे,‌ शहराध्यक्ष संजय छल्लारे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सिद्धार्थ फंड, माजी नगरसेवक आशिष धनवटे, बाजार समितीचे सुधीर नवले, जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, नगरसेवक शशांक रासकर, मनोज लबडे, प्रसाद चौधरी, प्रतीक बोरावके, गोपाळ लिंगायत, अजय धाकतोडे आदींनी मोठे योगदान दिले.

Related Articles

Back to top button