महाराष्ट्र

एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी पक्षाची सिन्नर येथे आढावा बैठक संपन्न

सिन्नर प्रतिनिधीएकलव्य आदिवासी बहुजन पार्टी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रेवणनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  
   सिन्नर गेस्ट हाऊस येथील एकलव्य पक्षाची आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पक्षाचे महासचिव डॉ. राहुल अहिरे, सिन्नर शहराध्यक्ष आशाताई बर्डे या होत्या. बैठकीत महाराष्ट्र राज्य कमिटीच्या पदाधिकारी, नाशिक जिल्हा कमिटीचे पदाधिकारी तसेच सिन्नर तालुका कमिटीचे पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्या आहोत.

महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष विष्णुजी नाईक, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख तुषार आहिरे, महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष सौ. सुषमाताई किरण बोरसे, नाशिक जिल्हा अध्यक्ष अशोक नाईक, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार ,नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष आप्पासाहेब माळी, नाशिक जिल्हा संघटक चंद्रशेखरजी रोकडे, नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष सौ. मंदाताई चंद्रशेखरजी रोकडे ,नाशिक जिल्हा महिला कार्याध्यक्ष सौ कमलताई दिलीप सोनवणे, नाशिक जिल्हा सचिव सुरेश निवृत्ती माळी, पश्चिम नाशिक जिल्हा सचिव सागर पवार, सिन्नर शहराध्यक्ष सुदाम तांबे, महिला सिन्नर तालुका उपाध्यक्ष सौ जिजाबाई पिंपळे, सिन्नर तालुका महिला सचिव सौ अलकाताई गुंजाळ, सिन्नर तालुका महिला संघटक अध्यक्ष सौ मंगलताई कुंवर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button