अहमदनगर
छावा संघटना पदाधिकाऱ्यांच्या निवडी
राहुरी प्रतिनिधी : तालुक्यातील तांभेरे येथे अखिल भारतीय छावा संघटनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीत तालुका उपाध्यक्षपदी विनोद दिनकर मुसमाडे, तांभेरे शाखाध्यक्ष विजय नानासाहेब गागरे, तांदूळनेर शाखाध्यक्ष सौरभ चांगदेव शिंगोटे, रामपूर शाखाध्यक्ष अनिल बाळासाहेब नालकर आदींच्या निवडी करण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष नितीन पटारे व तालुका प्रमुख रमेश म्हसे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
बैठक अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे, तालुका अध्यक्ष रमेश म्हसे, तालुका कार्याध्यक्ष अमोल वाळुंज, शेतकरी नेते निलेश बनकर, सहयाद्री उद्योग समुहाचे डॉ.रविंद्र महाडीक, लोकनियुक्त सरपंच नितीन थोरात, भारत म्हसे पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.