अहमदनगर

चिंचोलीत देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन वृक्षारोपण करुन साजरा

राहुरी प्रतिनिधी : तालुक्यातील चिंचोली येथे देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या स्व. जनार्दन काळे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात शाळेच्या आवारात जवळपास १२० झाडे लावत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

     प्रारंभी स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष शंकर लाटे व लष्करात कार्यरत असलेले जवान अक्षय वर्पे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी नव्यानेच बदलून आलेले प्राचार्य तांबे यांनी शाळेच्या विविधांगी प्रगतीबद्दल माहिती देताना ग्रामस्थांना शाळा विकासात मदत करण्याचे आवाहन केले. सरपंच गणेश हारदे यांनी कोविड काळात प्राण वायुच्या गंभीर समस्येला सर्वांना तोंड द्यावे लागले आहे. निसर्गाकडून भरपूर व मोफत मिळत असलेल्या प्राणवायुची गरज अधोरेखित झाली असून यापुढे झाडांच्या लागवडीवर भर द्यावा लागणार असल्याचे सांगत आज तरुणांच्या पुढाकारातून शाळेच्या आवारात जवळपास १२० झाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांच्या संगोपनासाठी शाळेच्या सहकार्याने परिश्रम घेणार असल्याचे सांगितले. या झाडांच्या रोपणासाठी विनोद चोखर या तरुणाने आपला जेसीबी मोफत उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले.
 शाळेच्या परिसरात या झाडांचे रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी जालिंदर काळे, अशोक गागरे, विलास लाटे, संजय राका, पांडुरंग पठारे महाराज, सोपान काळे, संभाजी आरगडे, शरद आरगडे, दिलीप दाढकर, रायभान नलगे, विजय सिनारे, बाळासाहेब लाटे, सर्जेराव लाटे, सुनील लाटे, सर्जेराव सोनवणे, अकील शेख, डॉ. नलगे, संदिप लोखंडे, संजय भोसले, ग्रामसेवक गाडे, वामन लाटे, आदिंसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होतेे. सुत्रसंचलन गिरी सर तर आभार गोरे सर यांनी मानले.

Related Articles

Back to top button