कृषी
निपाणी निमगाव येथे ग्रामीण कृषी जागृकता आणि औद्योगिक कार्यानुभव प्रात्यक्षिक कार्यक्रम
नेवासा प्रतिनिधी : तालुक्यातील निपाणी निमगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषिदूत ओंकार सुरेश झांजरे, ऋषिकेश कैलास ढोकणे आणि वीरेंद्र विजय पवार यांनी ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम दौऱ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांतर्गत शेतातील माती परीक्षण, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, एकात्मिक तण, कीड व रोग व्यवस्थापन तसेच कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर जसे अवजारांचा वापर शेतीचे आर्थिक नियोजन जनावरांचे लसीकरण आदी विषयांवर ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध विषयांचे प्रात्यक्षिके आयोजित करून आधुनिक तंत्रज्ञाना विषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी कृषी मोबाईल ॲपचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. आधुनिक शेती करताना कृषी मोबाईल ॲपचा वापर शेतकऱ्यांनी करुण नवीन तंत्रज्ञानाचा शेतीत उपयोग करावा असे त्यांनी सांगितले.
यावेळी निपाणी निमगावचे सरपंच अविनाश चव्हाण, ग्रामसेवक विष्णू घाणापुणे, डॉ. वैजनाथ जाधव, प्रगतशील शेतकरी दिलीप जाधव, अनिल काकडे, संपत कराळे, ज्ञानेश्वर पवार, राजू पवार, सभाजी काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालय पुणे येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, डॉ. एम. व्ही. अजोतीकर आणि डॉ. यु .डी. जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले.