कृषी

बीज प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

बाभूळगाव येथे कार्यशाळा: कृषिकन्या सुवर्णा थोरात हिने दिली माहिती
राहूरी विद्यापीठ प्रतिनिधीबीजप्रक्रिया करणे किती फायदेशीर आहे ,याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत,कृषी महाविद्यालय भानसहिवरे येथील विद्यार्थिनी कु. सुवर्णा भारत थोरात हिने कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले. कृषी महाविद्यालय भानसहिवरे येथील विद्यार्थिनी कु.सुवर्णा भारत थोरात हिने ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२अंतर्गत बाभूळगाव येथे कार्यशाळा घेतली. कार्यशाळेला गावातील शेतकरी उपस्थित होते. पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाणांची निवड करण्यापासून ते बीज प्रक्रिया केल्यास कीटकांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.बदलत्या हवामानामुळे पीक विविध रोगांना बळी पडतात त्यामुळे पेरणी करताना शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे थोरात हिने सांगितले. बीजप्रक्रिया करण्यासाठी कोणत्या पिकाला कोणते औषध वापरतात तसेच बीज प्रक्रिया करताना कोण- कोणती खबरदारी घ्यायला हवी याविषयी देखील माहिती सांगितली.ही कार्यशाळा घेण्यासाठी तिला कार्यक्रम समन्वयक प्रा. एम. आर. माने ,प्रा. सी. के.गाजरे.,प्रा. पी. बी. काळे यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Back to top button