विश्वकर्मा हे देवतांचे वास्तुकला तज्ञ- मा.आ.अतुल सावे
पैठण : विश्वकर्मा हे देवतांचे वास्तुकला तज्ञ आहे. यांनी देवतांसाठी महल व सर्व शस्त्रास्त्रे बनवली. आज सर्व कलाकुसरी क्षेत्रातल्या कारागिरांना प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी करून आनंद होत आहे. असे प्रतिपादन आमदार अतुल सावे यांनी केलेले.
ते औरंगाबाद येथे विश्वकर्मा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान प्रभू विश्वकर्मा यांचे भारतातील गंगा, यमुना, नर्मदा, कावेरी, गोदावरी, शिप्रा, ब्रह्मपुत्रा या सप्त नद्यांच्या जलाने महाजलाभिषेक, महापूजा करून आरती करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून औरंगाबाद पूर्वचे मा.आ.अतुलजी सावे, संजय बोराडे, अरुण भालेकर, गोपाल भाऊ, बाबुराव हिवाळे, शेषराव पोपळघट बाबुराव कवसकर हे उपस्थित होते.
त्याच बरोबर लोहार समाजाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे, समाजपरिवर्तनासाठी सर्वस्व अर्पण करणारे ज्येष्ठ मंडळींचे सपत्नीक सन्मानपत्र, शाल व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यामध्ये श्रीरंग विघे, दगडू खैरनार, कमलबाई उत्तमराव हरेल, संजीवनी राधाकिसन थोरात रामदास हरणे, दिनकर गाडेकर, रामदास थोरात, उद्धवराव हरेल, किसन पोपळघट रावसाहेब कळसे, विष्णू पोपळघट, मनोहर तांबे, प्रदीप वाघ, शंकर परेराव, अनिल चाफेकानाडे, दिलीप हरणे, रमेश दिसागज, अंकुश लाड, श्रीकिशन डाखोरकर हे सत्कार मूर्ती होते.
प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्त मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभु विश्वकर्मा जयंती निमित्त विश्वकर्मायुवा एकत्रीकरण बचत गटातर्फे वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, शैक्षणिक, सामाजिक जनजागृती वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमावर विशेष भर देत असतो. लक्ष्मीकांत हरेल यांनी सप्त नद्याचं पाणी सर्व लोहार समाजातल्या कुटुंब प्रमुखास देऊन सोबत प्रभु विश्वकर्माच्या पूजेतील कडधान्याचे पॅकेट देऊन सुख-समृद्धी लाभेल असे सांगितले. महिलांनी भजनाचा आनंद घेतला. शेवटी विश्वकर्मा युवा एकत्रीकरण बचत गटातील सर्व सदस्यांनी आपला सपत्नीक परिचय देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राजू पोपळघट यांनी केले तर आभार प्रा.पांडुरंग हिवाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री प्रभु विश्वकर्मा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिगंबर हरेल, उपाध्यक्ष योगेश कव्हळे, सचिव गणेश तांबे, सहसचिव संतोष लोहार, श्निलेश थोरात, संदिप वैद्य,गजानन जगताप, दुर्गादास वैद्य, प्रविण बाधले, किशोर दिसागज, कार्याध्यक्ष प्रशांत हरेल, रवी कव्हळे, दत्तात्रय पोपळघट, प्रा. डॉ. राज पोपळघट, पांडुरंग हिवाळे, संदिपानजी थोरात, लक्ष्मीकांत हरेल, विठ्ठल हिवाळे, शंकर पोपळघट, सदस्य संतोष लोहार, अमोल लोहार, विजय लोहार, दत्ता पोपळघट, निलेश थोरात, शंकर पोपळघट, गणेश तांबे, संदिप वैद्य, गणेश खंडाळे, लक्ष्मीकात हरेल, निरंजन हरेल, दिगंबर हरेल, केशव हरेल, योगेश जवणे, योगेश कव्हळे, विठ्ठल हिवाळे, आशिष हारेल, दिपक कव्हळे, दत्ता बाधले, प्रविण बाधले, गणेश हिवाळे, कल्याण मते, ईश्वर मते, कृष्णा टाकसाळ, किशोर दिसागत, रवि थोरातसह विश्वकर्मा युवा एकत्रीकरण बचतगट औरंगाबाद जवळील सर्व लोहार समाज बांधव व भगिनी यांचे सहकार्य लाभले.
Covid-19 चे सर्व नियम पाळून श्री प्रभु विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विश्वकर्मा युवा एकत्रीकरण बचत गटातील सदस्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.