अहमदनगर

उद्घाटन बोर्डावरचा फुल, हार सुकण्यापुर्वी रस्ता खराब; ठेकेदारावर कारवाई न केल्यास आंदोलन करणार – रामभाऊ तरस

निमगाव खैरी ते नाऊर रस्ता ठिकठिकाणी खराब झाला आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी/ अरुण काळे : तालुक्यातील निमगांव खैरी-जाफराबाद-नाऊर या अडीच किलोमीटर रस्त्याचे उदघाटन बोर्डावरचा फुल, हार सुकले नाही तोच या रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे.असा आरोप भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ तरस यांनी केला आहे.हा रस्ता ठिकठिकाणी खचला असुन उत्कृष्ट कामाचा निकृष्ठ नमुना समोर आला आहे.संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत गुन्हे दाखल न केल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेतले जाईल,असा इशारा देण्यात आला आहे.
     गेल्या आठवडाभरापूर्वी आमदार लहु कानडे यांनी उदघाटन केलेल्या अडीच किलोमीटर रस्त्यासाठी सुमारे ४४ लक्ष रुपये तरतुद करून केलेल्या रस्त्यावर खड्डे पडून रस्ता अनेक ठिकाणी खचला असुन या रस्त्यावर डांबर अतिशय कमी वापरून इस्टिमेट प्रमाणे काम न करता रस्त्याची झाड लोट न करता, खडी देखील खराब वापरून साईडपट्टीसाठी शेडवट मुरूम वापरण्यात आला असुन ती साईडपट्टी सुद्धा काही ठिकाणी अतिअल्प मुरूम टाकण्यात आला आहे. हा रस्ता दोन तालुक्याला जोडणारा प्रमुख मार्ग असुन ठिकठिकाणी उधडला आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असुन ठेकेदारी स्टाईलने हे काम करण्यात आला असुन हे डांबरीकरणाचे काम सुरु असतांना कोणतेही शाखा अभियंता सुद्धा उपस्थित नव्हते. या कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ तरस यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व बांधकाम मंत्री यांना पाठवण्यात आल्या आहेत.  
     यापूर्वी मागील वर्षी जिल्हा परिषदच्या माध्यमातुन याच ठेकेदाराने ८०० मीटर रस्त्याचे काम निकृष्ट केले होते. पुन्हा अडीच कि.मी. रस्ताचे बील काढण्यासाठी मागील वर्षी झालेल्या ८०० मीटर रस्त्याला फक्त वरील डांबराचा थर देऊन पुन्हा संपूर्ण अडीच कि.मी. काम दाखवून शासनाची आर्थिक फसवणूक करत असुन वास्ताविकता हे ८०० मीटर पूर्वीचे काम सोडुन पुढील काम करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता बील काढण्याची घाई सुरु असुन यामध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यासह ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत दोन दिवसांत कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाजपाचे उपाध्यक्ष तथा तंटामुक्तीचे अध्यक्ष रामभाऊ तरस यांनी दिला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button