कृषी

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते अनुकंपा तत्वावर नियुक्ती आदेश प्रदान

अनुकंपा तत्वावर नियुक्ती आदेश प्रदान करताना कुलगुरु डॉ.पी.जी.पाटील, डावीकडून तत्कालीन कुलसचिव डॉ.महानंद माने, संशोधन संचालक डॉ.शरद गडाख, अधिष्ठाता डॉ.अशोक फरांदे.

राहुरी विद्यापीठ/ जावेद शेख : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात विद्यापीठ सेवेत कार्यरत असताना दिवंगत झालेल्या कर्मचार्यांच्या ९ वारसांना अनुकंपा तत्वावर कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले.

    सदर दिवंगत झालेल्या कर्मचार्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नियुक्ती आदेश देणे गरजेचे असताना आदेश निर्गमीत करावयाची प्रक्रिया तांत्रिक बाबींचा आडोसा घेत जवळपास एक वर्षापासुन रखडवून संबंधीत वारसांना नियुक्ती आदेश मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आलेले होते. परंतु, कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या कर्तव्य दक्षतेने व गतिमान प्रशासनाच्या संकल्पनेतुन सदर नियुक्ती आदेश निर्गमीत करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात आली. अनुकंपा तत्वावर निर्गमीत करण्यात आलेल्या नियुक्ती आदेशातील ८ कर्मचार्यांना वर्ग-४ संवर्गात व १ कर्मचार्यास वर्ग-३ संवर्गात नियुक्ती देण्यात आली. सदर उमेदवारांना विद्यापीठ सेवेत सरळसेवेने अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिल्याबद्दल कुलगुरुंचे सर्व स्तरातुन स्वागत करण्यात येत आहे. या कामी कुलसचिव व त्यांचे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहाय्य झाले.विद्यापीठात आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. याप्रसंगी अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक फरांदे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, तत्कालीन कुलसचिव डॉ. महानंद माने आणि नियंत्रक विजय कोते उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button