महाराष्ट्र
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
पुणे प्रतिनिधी : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा सौ.मंदा बनसोडे यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान पिंपरी चिंचवड महापौर उषा उर्फ माई डोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने पत्रकारांनी एकत्र येत ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान केला.ज्येष्ठ पत्रकारांनी केलेली पत्रकारिता वाखाणण्याजोगी असून अति प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता ,संकटांवर मात करत, अन्याय,अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत कोणत्याही साधनसामुग्रीचा सोयीसुविधा नसताना खूप कष्टाने केलेली पत्रकारिता खूप काही शिकवून जाते, शिवाय आता नव्याने आलेले तंत्रज्ञान यांचा चातुर्याने अभ्यासक वृत्तीने वापर करणारे ज्येष्ठ पत्रकार त्यांचे अथक परिश्रम, चिकाटी,अभ्यासू व संशोधक बुद्धी,जिज्ञासु बुद्धी, सय्यम,बुद्धिचातुर्य कुणालाही विचार करण्यास भाग पाडते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार यांच्या पत्रकारितेतील कारकिर्दीला उजाळा देत त्यांच्या आयुष्यभरातील पत्रकारितेच्या कार्याला वंदन करून त्यांच्या कार्याला सलाम करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पत्रकार कक्षात ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी शिवाजी शिर्के, माधव सहस्रबुद्धे, बाळासाहेब ढसाळ, नाना कांबळे, मदन जोशी, सुनील कांबळे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर माई ढोरे, नगर सदस्य अनुराधा गोरखे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, विशाल कसबे तसेच पत्रकार प्रवीण शिर्के दिनेश दुधाळे, कलिंदर शेख, दिलीप देहाडे, विकास कडलक, दिपक साबळे, देवा भालके, विक्रम पवार आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. यावेळी दादाराव आढाव यांनी सूत्रसंचालन केले.