अहमदनगर

वरवंडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांचे ना. तनपुरेंच्या हस्ते भुमिपुजन

वरवंडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांचे भुमिपुजन करताना ना.प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे, दिगंबर ताकटे आदी मान्यवर.

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/ जावेद शेख : तालुक्यातील वरवंडी येथील जिल्हा परिषद सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे यांच्या विकास निधीतुन १७.५० लाख खर्चाच्या जि.प. प्राथमिक शाळेच्या दोन नविन खोल्यांचे भुमीपुजन सोहळा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते व धनराज गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या शाळेची नविन इमारत उपलब्ध जागेत होत नसल्याने जागा कमी म्हणुन वरवंडीचे प्रगतशील शेतकरी दिगंबर ताकटे यांनी आपल्या शेतजमिनीतुन शाळेला जागा उपलब्ध करून दिली.यापुर्वी सुद्धा याच शाळेला त्यांच्या वडीलांनी जागा उपलब्ध करुन दिली होती.दिगंबर ताकटे यांच्या दानशूर सामाजिक कार्याचा सन्मान करत ना.तनपुरे व धनराज गाडे यांनी त्यांचे आभार मानले.भुमिपुजनाचे पहिले नारळ ताकटे यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्यध्यापिका श्रीमती जाधव यांनी मंत्री महोदय यांच्याकडे एल.इ.डी.,विज कनेक्शन व शाळेच्या जुन्या खोल्यांची दुरुस्तीची मागणी केली. या मागण्या लवकरच पुर्ण करण्याची ग्वाही राज्यमंत्री तनपुरे यांनी दिली.

वरवंडी येथे ना.तनपुरे यांचे आगमन झाल्यावर ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी राहुरी पंचायत समितीचे सभापती अण्णासाहेब सोडणर,उपसभापती प्रदीप पवार,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सलीमभाई शेख,सरपंच भाऊसाहेब कोळेकर,उपसरपंच शकुंतला पवार,जगदीश भालेराव,बंटी अडसुरे,पप्पू बर्डे, संजय अडसुरे, दिगंबर ताकटे,शरद ढगे,ज्ञानदेव बरे,सुरेश भुजाडी,दगडू बर्डे, गणीभाई शेख,विजय कदम,निशार पटेल,दिलीप अडसुरे,परशराम अडसुरे,आबा भालेराव,कैलास पवार,राजु पवार,भास्कर काळे,बाबासाहेब अडसुरे,गोरक्षनाथ भालेराव,नवनाथ ढगे,श्रीकांत ढगे,जालिंदर अडसुरे,नारायण शिंदे,दत्तु अडसुरे,रमेश निसाळ, मुख्यध्यापिका सुनिता जाधव,मंदाकीनी निसाळ,कोंडीराम बाचकर आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button