राजकीय

काँग्रेस पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी जाधव

महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते तालुका उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र स्विकारताना जाधव… 

 
आरडगांव (प्रतिनिधी) राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राहुरी तालुका उपाध्यक्षपदी आरडगाव येथील वसंत उर्फ पोपट कोंडीराम जाधव यांची निवड करण्यात आली आहे. 
   अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत राहुरी तालुक्यातील पक्षाच्या कामावर ना.बाळासाहेब थोरात यांनी समाधान व्यक्त करत महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव यांच्या स्वाक्षरीने पोपट जाधव यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे,प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस सौ.अनुराधाताई नागवडे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके,जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब साळुंके,समन्वयक
ज्ञानदेव वाभारे,तालुका महिला अध्यक्ष कमलताई साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी नानासाहेब आढाव,संजय सोंडकर,सुभाष वने,विजय खाडे,रुपचंद जाधव,सिद्धेश्वर जाधव,मनोज भुजबळ,आलेखा पठाण,भास्कर आढाव,किरण वाघ आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.जाधव यांचे विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे.

” काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष पोपट जाधव “

“राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदाची धुरा नामदार थोरात साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवून सोपवली.या विश्वासाला न्याय देत प्रामाणीकपणे जबाबदारी पार पाडील व पक्ष वाढिसाठी तळागाळातील गोरगरीब समाजातील लोकांना बरोबरीनी एकत्र घेऊन काम करील,अशी प्रतिक्रिया उपाध्यक्ष पोपट जाधव यांनी व्यक्त केली.”

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button