राजकीय

विजय चव्हाण यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश

 
        विलास लाटे/पैठण : मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ.संदीप क्षिरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत बिडकीन गटाचे जि.प.सदस्य विजय चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, पदवीधर आमदार सतीष चव्हाण, धनंजय मुंडे, माजी आ.संजय वाघचौरे, दत्ता गोर्डे. आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विजय चव्हाण यांच्यासह माणिक राठोड, ग्रामपंचायत सदस्य रियाजुद्दीन इनामदार, सागर फरताळे, असलम सय्यद, समद आतार, आजम शेख, नितीन वाघ, अमोल चव्हाण, भरत चव्हाण, राजेंद्र चव्हाण, निकेश राऊत, महेमुद शहा, निलेश धडे, प्रल्हाद काकडे, रुपेश शिंदे, योगेश शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये भव्य असा जाहीर प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमाप्रंसगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, पैठण तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, अख्तर शेख, ज्ञानेश्वर कर्डीले, संजीव कोरडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार…

जि. प. सदस्य विजय चव्हाण हे पैठण तालुक्यातील सर्वात मोठ्या बिडकीन जिल्हा परिषद गटात सलग दोन वेळा विजयी झाले आहेत. शिवाय सर्कलमध्ये त्यांचे चांगले काम आहे. त्याचप्रमाणे बंजारा समाजाचे मोठे पाठबळ पाठीशी आहे. वंचित बहुजन मुक्ती पार्टीकडुन त्यांनी गेल्या वेळी विधानसभा लढवली असून त्यात त्यांचा जरी पराभव झाला असला तरी त्यांनी भरपूर मते मिळवले होते. त्यामुळे येणाऱ्या काळात तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकतीत नक्कीच वाढ होण्यास मदत होणार आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button