औरंगाबाद

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने खेर्डा प्रकल्पाचे जलपूजन

   

  विलास लाटे/पैठण : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा.दिनेश पाटेकर यांच्या हस्ते संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गोपीनाना गोर्डे, संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिगंबर गोर्डे ग्रा.पं. सदस्य एजाज शेख ,ग्रा.पं. सदस्य बद्रीमामा गोर्डे व बालानगरचे पोलीस पाटील अप्पासाहेब गोर्डे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस बालानगरच्या वतीने खेर्डा प्रकल्पातील जलाचे  पूजन करून निसर्गा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

खेर्डा प्रकल्पाची जल पातळी उंचवल्यामुळे बालानगर सह जवळपास चाळीस ते पंचेचाळीस गावातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून या भागातील शेतकरी सुखावला आहे. यावेळी बद्रीनाथ गोर्डे ,बंटी ताकवले, लक्ष्मण पाटेकर, नंदकिशोर गोर्डे, भगवान गोर्डे, दत्ता ताकवले, राहुल गह्वाटे, शहादेव पाटील आदींची उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button