शिक्षणवारी ज्ञान पंढरी
गुणवंताचा सत्कार म्हणजे कौतुकाची थापच होय-सौ.शुभांगी गुंजाळ
जुन्नर ( खंडू माळवे ) : नक्षञाचं देणं काव्यमंच, महाराष्ट्र वतीने दरवर्षी जुन्नर तालुक्यातील सर्व शाळेतील प्रथम पाच आलेल्या विद्यार्थी वर्गाचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. गुणवंत सत्कार समारंभाचे सलग हे १५ वे वर्ष आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन वृक्षपूजन करुन, पाणी घालून करण्यात आले. पर्यावरण संदेश देत आगळ्यावेगळ्या पध्दतीने हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमातील पाहुणे स्वागत व प्रास्ताविक कविवर्य रामदास हिंगे यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार पुस्तक, गौरवचिन्ह, पुष्पगुच्छ
देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम अध्यक्षा जयहिंद शैक्षणिक संकुल डायरेक्टर सौ. शुभांगी गुंजाळ या प्रसंगी म्हणाले, “गुणवंत सत्कारामुळे मिळालेल्या यशाला शब्बासकीची थाप मिळुन यशाचा मार्ग आनंदी होतो. कठोर परिश्रमाला यशाची चंदेरी किनार मिळते. हा उपक्रम गेली पंधरा वर्षांपासुन नक्षञाचं देणं काव्यमंच वतीने संपन्न होत आहे. हे प्रेरणा देण्याचे काम कौतुकास पाञ आहे.
प्रमुख पाहुणे राजकवी डाॅ. ख.र.माळवे यावेळी म्हणाले की, “भारताचे भविष्य हे शाळेत घडत आहे. अशा कौतुक सोहळ्याने या पिढीला भक्कम होण्यास मदत होत आहे. संवेदनशिलता टिकविण्याची जबाबदारी हि संस्था यातुन करत आहे.” तसेच जयहिंद शैक्षणिक संकुल चेअरमन जितेंद्रशेठ गुंजाळ विशेष अतिथी म्हणुन उपस्थित होते. ते म्हणाले, “जयहिंद शैक्षणिक संकुल हे सामान्य कुटुंबातील विद्यार्थी वर्गासाठी शिक्षण उत्तम प्रकारे घेता यावे, यासाठी कार्य करत आहे. विविध शाखांच्या माध्यमातुन हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देण्याचा प्रयत्न करत आहे. कौतुक सोहळा हा नेहमी होणे गरजेचे आहे.” डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सभागृह, जयहिंद शैक्षणिक संकुल, मु. पो. कुरण ता. जुन्नर जि. पुणे येथे हा गुणवंत सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी कार्यक्रम अध्यक्षा डायरेक्टर-जयहिंद शैक्षणिक संकुल सौ. शुभांगी धर्मेंद्रशेठ गुंजाळ, कार्यक्रम विशेष अतिथी जयहिंद शैक्षणिक संकुल अध्यक्ष जितेंद्रशेठ गुंजाळ, ज्येष्ठ कायदेतज्ञ व गुरुवर्य ॲड. प्रफुल्ल भुजबळ महाराज, पुणे तसेच यावेळी कार्यक्रम विशेष प्रमुख पाहुणे उद्योजक अमर प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रमुख शुभमशेठ नाईक, जयहिंद शैक्षणिक संकुल कुरणचे सचिव विजयशेठ गुंजाळ, राजकवी मा.वरिष्ठ रेल्वे अधिकारी, मुंबई डाॅ. ख.र.माळवे, जयहिंद शैक्षणिक संकुल कुरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. दत्ताञय गल्हे, कार्यक्रम प्रमुख पाहुणे नक्षञाचं देणं काव्यमंचचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र दशरथ सोनवणे, युवा उद्योजक लक्ष्मीकांत काजळे, निसर्गप्रेमी, कवी, माजी सैनिक रमेश खरमाळे, प्राचार्य डाॅ. किरण पैंठणकर, कवी रवी भोजणे, कवी पियुष काळे इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दहावी नंतर काय ?करिअरच्या विविध वाटांबाबत मार्गदर्शन जयहिंद औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य प्रा. सुभाष आंद्रे यांनी विद्यार्थी वर्गास केले. या कार्यक्रमाचे संयोजक व आयोजन नक्षञाचं देणं काव्यमंच, पुणे, जुन्नर तालुका विकास परिषद, जुन्नर, अमर प्रतिष्ठान, नारायणगाव, जयहिंद शैक्षणिक संकुल, कुरण यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास हिंगे यांनी केले. सूञसंचालन कवी वादळकार यांनी उत्तम केले. आभार प्रदर्शन मोहन कुदळे यांनी केले. पसायदान या विश्वगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रत्येक विद्यार्थी वर्गास सन्मानपञ, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मुख्याध्यापकांना मोजणी तक्ता, गौरवचिन्ह, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणांत संपन्न झाला.