महाराष्ट्र

गेल्या 20 वर्षांपासून नोकरी, पगार अवघा 9 हजार; वसतिगृहाच्या अधीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातल्या शेळगाव इथं एका अनुदानित वसतिगृहातील अधीक्षकानं तुटपुंजे मानधन ते सुध्दा वेळेवर होत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
यापूर्वी देखील पगाराच्या कारणामुळे एका कर्मचाऱ्याने आत्महत्येचं धक्कादायक पाऊल उचललं होतं. यानंतर पुन्हा एकदा राज्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. शासनाने वसतिगृह कर्मचाऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह संघटनेने दिला आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील हेळब या गावी समाज कल्याण विभागाअंतर्गत नागाबुवा मागासवर्गीय वसतिगृह आहे. येथील चाकूर तालुक्यातील शेळगाव येथे 35 वर्षीय भरत किसन राजुरे हा गेल्या 20 वर्षांपासून वसतिगृह अधीक्षक पदावर नोकरी करत होते. सदरील वसतिगृह 100 % अनुदानित आहे. पण कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावर नियुक्त्या दिल्या आहेत. सध्या हे कर्मचारी 9 हजार 200 रुपये मासिक मानधनावर काम करत होते. पण अनेकदा सदरील मानधन कधी 3 महिने तर कधी 6 महिने उशिराने होत असे आणि 20 वर्षांपासूनची वेतन श्रेणीची मागणी प्रलंबीत होती. यामुळे यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असल्यानं त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कर्मचाऱ्याच्या वडिलांनी दिली आहे. या घटनेला राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

वसतिगृह हे 100% आनुदानीत असुन कर्मचारी मात्र मानधनावर. ते ही सहा- सहा महीने मानधन मिळत नाही. या वर्षात ६ आत्महत्या झाल्यात. शासनाने वसतिगृह कर्मचार्यांना त्वरित वेतन श्रेणी लागु करावी.

 ~ बापु दिघे ( राज्य उपाध्यक्ष अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना )

Related Articles

Back to top button