अहमदनगर
राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची बदली थांबवा- मनसेची मागणी
आरडगांव/ राजेंद्र आढाव : राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ ह्यांनी राहुरी मध्ये कोरोनो काळामध्ये अतिशय शिस्तबद्ध काम केले आहे तसेच ग्रामिण भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा बसवला व राहुरी तालुक्यात आज पर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई कधी झाली नव्हती. त्यामुळे यांनी कमी कालावधीमध्ये सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले आहे.
अशा कर्तबगार पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ ह्यांची बदली रद्द करावी व राहुरी तालुक्यासाठीचा कार्यकाळ वाढवला तर राहुरी तालुक्यामध्ये कायद्याचा वचक अबाधित राहील. राहुरी तालुका मनसे पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ ह्यांच्यासारख्या संयमी व शिस्तबध्द अधिकाऱ्याची राहुरी तालुक्याला नितांत गरज आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचा त्यानी बिमोड केलेला आहे दुधाळ साहेबांची बदली रद्द झाली तर राहुरी तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरेल व गुन्हेगारांमध्ये भीतीचे सावट निर्माण होईल आज पर्यन्त राहुरी तालुक्यसाठी असे धडाकेबाज अधिकारी या आधी कधीच लाभले नव्हते. तुम्ही पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ ह्यांची बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष प्रतीक विधाते ह्यांनी केली आहे.