कृषी
स्वातंत्र्यदिनी कृषिदुताकडुन एकांकिका सादर
राहुरी प्रतिनिधी : तालुक्यातील कोंढवड येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय विळद घाट येथील कृषीदुत अभिषेक सिताराम चव्हाण हा ग्रामीण कृषी जागृतता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम सादर करत आहे.
कृषिदूत अभिषेक सिताराम चव्हाण यांनी स्वातंत्र्यदिनी कोंढवड येथे उपस्थितीत ग्रामस्थांना कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगितले. यावेळी त्यानी उपाययोजना व नियम पाळावे यासाठी एकांकिका सादर करून जनजागृती केली आहे.
या कार्यक्रमास उत्तमराव म्हसे, सरपंच आशादेवी म्हसे, उपसरपंच कविताताई म्हसे, सोसायटिचे चेअरमन तान्हाजी नेहे, मुख्याध्यापिका सरस्वती खराडे व सर्व शिक्षक, ग्रामसेवक शिवाजी पल्हारे, तलाठी वर्षा कातोरे व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमाला प्राचार्य डॉ. एम. बी धोंडे, उपप्राचार्य डॉ. एच. एल शिरसाठ, प्रा. डॉ. व्हि.एस निकम, प्रा. एस. बी राऊत, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. के दांगडे, प्रा. पी. आर हसनाळे प्रा. किशोर मोरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.