अहमदनगर

सावकाराने केले शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत करुन कारवाई करण्याची मागणी

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत करुन कारवाई करण्याची मागणी छावा प्रतिष्ठानचे राज्य संपर्क प्रमुख सतीश सौदागर यांनी केली आहे.

राहुरी प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील यावती गावातील गौतम आढाव या कर्जबाजारी शेतकऱ्याने सावकारीच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केली. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ईमेलद्वारे शिवशंभू छावा प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन पाठवण्यात आले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयातून या प्रकरणी आर्थिक मदत व पुनर्वसन विभाग व गृह विभाग यांच्याकडे कारवाईसाठी पत्र पाठवण्यात आले असल्याचे शिवशंभु छावा प्रतिष्ठानचे राज्य संपर्कप्रमुख सतीश सौदागर यांना कळवण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, गौतम भानुदास आढाव मु .पो. यावती, धवलगाल ता. श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर यांनी दि. 16 .8. 2021 रोजी पहाटे आपलाच सख्खा चुलतभाऊ रामा पोपट आढाव व परिवाराकडून होत असणा-या शारीरिक, मानसिक व सावकारी तसेच कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली होती. सदर घटनेमध्ये आरोपी रामा आढाव हा सावकारी धंदा करत असे. तो अडाणी असल्याने पत्नी व मुले यामध्ये त्याची मदत करत दुपटी तिपटीने व्याज लावत असे आणि व्याजाची रक्कम परत न करू शकल्याने पिडीत कुटूंबांच्या हक्काच्या शेतात त्यांना पाय ठेवून देत नसे. शेतमाल स्वतः घेऊन जात असे. आत्महत्या करण्यापुर्वी सरपंच सौ.दिवटे यांचे सासरे आणि माजी सरपंच नागेशभाऊ मस्के, पिडीत कुटूंब व नातेवाईक यांच्यामध्ये समन्वयक बैठक झाली. यावेळी आरोपी रामा आणि त्याच्या कुटुंबाला समज देण्यात आली की तुम्ही असे गरिबांवर अन्याय करू नका. तरीदेखील हे लोक कोणत्याही प्रकारे ऐकत नव्हते. शेतात शेतमाल आणायला गेले असता पिडीत कुटूंबाला आरोपी रामा व घरच्या लोकांनी मारहाण केली व त्यावर आता आमचा अधिकार आहे, तुम्ही इकडे फिराकायचे देखील नाही. हे सगळं काही सहनशक्तीच्या पलीकडे गेले. नात्याने भाऊ असल्याने पिडीत कुटूंब हे टोकाचे पाऊल ऊचलत नव्हते. आरोपी रामा हा त्यांना उलट धमाकावत की मी विट कारखान्याचा मालक आहे आणि तुम्ही माझी काहीच बिघडू शकत नाही.
यामुळे मी माझी जीवनायाञा संपवली आहे आणि चिठ्ठी स्वरूप पुरावा लिहून ठेवला. त्यात मिडीया, गावकरी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना देखील कळकळीची विनंती केली आहे. हे समजताच आरोपी रामा आपल्या कुटूंबासमवेत पसार झाला आहे असुन समस्त गावकरी पिडीत कुटूंबाचे नातेवाईक यांनी तातडीने कारवाई करण्यात यावी व कठोर शिक्षा देण्यात यावी व कुटुंबाला आर्थिक मदत तातडीने करण्यात यावी ही विनंती केली. तसेच पोलीस प्रशासनाने आरोपी रामा आणि त्याला सावकारकीमध्ये सहकार्य करणा-या त्याच्या घरातील व्यक्तींवर ताबडतोब कारवाई करावी,अशी मागणी शिवशंभू छावा प्रतिष्ठानचे सतीश सौदागर व सचिन मैंद यांच्या वतीने करण्यात आली होती.

Related Articles

Back to top button