अहमदनगर
संगमनेरमध्ये कामगार व युवकांचा मनसेत जाहीर प्रवेश
संगमनेर/ बाळासाहेब भोर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत विविध क्षेत्रातील कामगार व युवकांनी संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर आज जाहीर प्रवेश केला. प्रश्न कोणताही असो त्यासाठी नेहमीच निर्भीड, रोखठोक व प्रभावी भूमिका घेणारे, मराठी मातृभाषेविषयी आदर व आग्रही भूमिका मांडणारे नेतृत्व म्हणून आज अनेक युवक राज साहेबांकडे बघतात. विद्यार्थी, कामगार व सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न मनसेने प्रसंगी आंदोलन करून वेळोवेळी मार्गी लावले आहेत. त्याचेच फलित म्हणून आज अनेक युवक मनसेलाच पसंती देत आहेत. या पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी मनसे कामगार सेनेचे विजय निकम, विभाग संघटक-चांदिवली विधानसभा मनसे वाहतूक सेना अनुप गुप्ता, मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रफुल्ल दळवी यांच्या उपस्थितीत कामगार व युवकांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष किशोरजी डोके, माजी शहर प्रमुख अभिजीत कुलकर्णी, संजय वाणी, संकेत लोंढे, प्रमोद काळे, संदीप आव्हाड, रविंद्र कानवडे, दर्शन वाकचौरे, मनोज दातीर, यश चव्हाण, रुषि कोल्हे, वैभव कानवडे, दौलत सातपुते, धनंजय नरवडे, संजय शिंदे, अविनाश भोर, दिपक गडाख व आदी पदाधिकारी व महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.