औरंगाबाद
७४ जळगांव येथील भाजप व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
पैठण/विलास लाटे : पैठण तालुक्यातील ७४ जळगांव ग्रामपंचायत अंतर्गत शहापूर मानेगाव येथील भाजपाचे ग्राम पंचायत सदस्य रामभाऊ मतकर तसेच राष्ट्रवादी सर्कल प्रमुख मारोती लाटे, किशोर इथापे, संतोष लाटे आदींनी नामदार संदिपान भुमरे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी मतकरवाडी ते खामजळगाव व शहापूर माणेगाव हा रस्ता नदीवरील पुलासहित मुख्यमंत्री सडक योजनेतुन मंजूर करण्याचे आश्वासन नामदार भुमरे यांनी दिले. याप्रसंगी ७४ जळगांव चे उपसरपंच नितीन एरंडे, शिक्षक सेना तालुकाप्रमुख अमोल एरंडे, शिक्षक पतसंस्था माजी चेअरमन शिवाजी एरंडे, जि प विधी सल्लागार ॲड. सचिन एरंडे, ग्रामपंचायत सदस्य जनार्धन क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य विक्रम एरंडे, ग्राम पंचायत सदस्य बाळासाहेब मुळे, माजी ग्राम पंचायत सदस्य हरीभाऊ घेगडे, बाबासाहेब घेगडे, संतोष किर्जत, संजय एरंडे आदींची उपस्थिती होती.