आरडगांव येथे आदिवासी कुटुंबांना किराणा किटचे व शिधापञिकेचे राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते वाटप

आदिवासी विकास विभागाकडुन आरडगाव येथे खावटी योजने अंतर्गत किराणा किटचे वाटप 

अहमदनगर/ जावेद शेख : आदिवासी विकास योजने अंतर्गत आज आरडगांव येथे आदिवासी कुटुंबांना किराणा किटचे व शिधापत्रिकेंचे वाटप आदिवासी विकास राज्य मंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते करण्यात आले.

आदिवासी विकास योजने मार्फत सध्या खावटी किट व रोख स्वरुपात रु.2000 प्रमाणे वाटप दुसरा टप्पा सुरु झाला असुन राहुरी येथील आदिवासी कुटुंबांना याचा लाभ मिळालेला आहे. आज आरडगांव येथील 30 कुटुंबांना रोख स्वरुपात रु.2000 तसेच अत्यावश्यक किराणा किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. तनपुरे कारखान्याचे मा. संचालक सुरेश झुगे होते.

यावेळी मंत्री तनपुरे म्हणाले की, आदिवासी विकास खात्यामार्फत महाविकास आघाडी सरकारच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहे. त्यामध्ये कोरोना काळात आदिवासी कुटुंबांना रोख रक्कम व किराणा किट वाटण्यात आल्या तसेच पन्हाळी पत्र्याचे वाटपही या विभागाकडुन झाले. आता 2 टप्पा सुरु असुन विविध योजना आदिवासी कुटुंबाना राबविण्यासाठी मी आदिवासी खात्याचा मंत्री म्हणुन कटीबध्द आहे. ज्या ज्या योजना राबविता येईल त्या त्या योजना राबविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. तसेच आदिवासी कुटुंबातील मुलांना व्यवसाय करण्यासाठी न्युकलेस बजेटमधुन शिबीराचे आयोजन करणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. यावेळी आदिवासी 30 कुटुंबाना शिधापत्रिकेचे वाटप मंत्री तनपुरे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच कर्णा जाधव, उपसरपंच श्रीमती कुसुमताई झुगे, सुनिल मोरे, रविंद्र आढाव, बाळासाहेब खुळे, कैलास झुगे, सुरेश झुगे, अनिल इंगळे, जनार्दन आटोळे, नाना म्हसे, डॉ.पोटे, भाऊसाहेब देशमुख, बीडीओ गोविंद खामकर, नायब तहसिलदार श्रीमती दंडीले, ग्राविकास अधिकारी भिगांरदिवे भाऊसाहेब आदि उपस्थीत होते. आभार जालिंदर काळे यांनी मानले. केंदळ खु व केंदळ बु तसेच पिंप्री वळण येथील आदिवासी 27 कुटुंबांना 2 टप्प्यात किराणा किटचे व शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.

यावेळी बाळासाहेब आढाव, बाबासाहेब भोईटे, राजेंद्र आढाव, शिवाजी आढाव, संदिप आढाव, तंटामुतीचे अध्यक्ष धोंडीराम आढाव, मा.मंडलअधिकारी लक्ष्मण आढाव, आप्पासाहेब गुंजाळ, सुभाष आढाव, प्रमोद तारडे, नामदेव तारडे, आण्णा देवरे, राजेंद्र तारडे आदि उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या