श्रीगोंदा : तालुक्यातील हिरडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरडगाव च्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया आज पार पडली. अध्यक्ष पदासाठी बरेच सदस्य इच्छुक होते. परंतु एक मत न झाल्यामुळे सदस्य सौ कविता सुनील दरेकर यांनी सर्व सदस्यांच्या चिठ्ठ्या टाकण्याची सुचना मांडली. त्या सुचनेला सर्व सदस्यांनी मान्यता दिली. मग चिठ्ठ्या टाकण्याची प्रक्रिया पारदर्शक पणे पार पडली. या प्रक्रियेत अध्यक्ष पदासाठी इच्छुक नसलेल्या भरत भुजबळ यांच्या नावाची अध्यक्ष पदाची चिठ्ठी निघाली व उपाध्यक्ष पदी सिताराम भुजबळ यांची चिठ्ठी निघाली तर सदस्य पदी कविता दरेकर, कल्पना भुजबळ, विठ्ठल दरेकर, संजय ससाणे, संध्याताई दरेकर, बंन्सिलाल दरेकर, रविंद्र ठवाळ यांची निवड झाली.

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी भरत भुजबळ तर उपाध्यक्ष पदी सिताराम भुजबळ यांची वर्णी लागल्याबद्दल माजी अध्यक्ष सुभाष दरेकर, माजी उपाध्यक्ष सतिश ठवाळ, सरपंच सुनिता दरेकर, उपसरपंच योगेश दरेकर, झुंबर दरेकर, चेअरमन बाळासाहेब शिंदे, संपतआण्णा दरेकर, भालचंद्र दरेकर,  रामदास बनकर, गंगाराम दरेकर, राजेंद्र दरेकर, चिमाजी दरेकर आदींनी अभिनंदन केले.