विलास लाटे/ढोरकीन : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, मच्छिंद्र पाटील, वैशाली लोंढे,जयश्री महाजन व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
यावेळी वैष्णवी तांगड ,वेदीका मिसाळ, वैष्णवी ठाणगे, आर्या निकम, श्रावणी निकम, अमृता वाघ, अर्चना पंडित, शौर्य हाडे, नैतिक बोरूडे, समर्थ राऊत यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांनी विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करून समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी जे योगदान दिले त्यांचे स्मरण करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या निकम तर आभार वैष्णवी ठाणगे हिने मानले.

0 टिप्पण्या