अहमदनगर/ जावेद शेख : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या जीसीसी-टीबीसी शासकीय कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स या नोव्हेंबर-२०२१ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात विषेश प्राविण्यासह विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
श्री दत्त कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयुट राजूरचे ग्रामीण, आदिवासी व अतिदुर्गम भागातील विद्यार्थी इंग्रजी विषयात ४० श.प्र.मी.मध्ये धादवड अनिकेत अशोक ९४% , इंग्रजी ३० श.प्र.मी.मध्ये कु. नवले अक्काबाई लक्ष्मण ९३% आणि मराठी ३० श.प्र.मी. मध्ये नवले सुवर्णा गंगाधर ९१% गुण घेऊन संस्थेतून प्रथम येण्याचा मान पटकविला. यासह देशमुख सुशांत रविंद्र ९१%, डगळे सुप्रिया धोंडीबा ९०%, पिचड आश्विनी ज्ञानदेव ९०%, पिचड स्वाती ज्ञानदेव ८९.५०%, कोंडार प्रथमेश काळू ८९% गुण, कोकतरे श्रीपत भागा ८९% आणि सुकटे सोनाली वसंत ८९% गुण घेऊन उत्तीर्ण झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य पंकज आभाळे यांनी अभिनंदन केले व या यशात विद्यार्थ्यांचा नियमितपणा व परिश्रम तसेच पालकांचा विश्वासाचा मोठा वाटा आहे अशी भावना व्यक्त केली. टिईटी घोटाळा प्रकरणामुळे परीक्षा परिषदेकडून निकालास विलंब लागल्यामुळे विद्यार्थी चिंतीत होते. पुढील परीक्षा संचलनात अडचणी निर्माण झालेल्या होत्या.
0 टिप्पण्या