अहमदनगर/ जावेद शेख : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा समन्वयक योगेश देशमुख यांची हिंद सेवा मंडळ अहमदनगर या नामांकित शैक्षणिक संस्थेत सहाय्यक सचिव पदी निवड झाल्याबद्दल अहमदनगर शिक्षक भारती व अकोले तालुका शिक्षक भारती यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, जिल्हा सचिव महेश पाडेकर, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती अकोले तालुकाध्यक्ष संपत वाळके, कार्याध्यक्ष गणपत धुमाळ, माध्यमिक विभागाचे अकोले तालुका अध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष दत्तात्रय घुले, मार्गदर्शक पंडित देशमुख, प्रमोद जोशी, संदीप महाडदेव, योगेश उगले व शिक्षक वृंद उपस्थित होते.
0 टिप्पण्या