सर्वात जास्त भाव देऊन तालुक्यात ऊसाचे एकही टिपरू राहु देणार नाही-राजेंद्र नागवडे; हिरडगाव येथे नवनिर्वाचित संचालक मंडाळाचा सत्कार

श्रीगोंदा/ सुभाष दरेकर : तालुक्यातील हिरडगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने नागवडे सहकारी साखर कारखानाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले की तालुक्यात शेतकर्यांचा पुर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाना बंद करणार नाही. ऊसाला २६०१ रूपयाच  सर्वाधिक भाव देणार आहे.

तालुक्यातील इतर कारखान्यात कामगारांचे पगार वेळेवर नाही मग शेतकर्याच्या ऊसाचे पैसे कधी मिळतील व किती मिळतील याची खात्री नाही, म्हणजे शेतकरी दुसर्या कारखान्याला ऊस देऊन 300 रूपयाचा तोटा करून घेतील. यावेळी विधानसभा लढविण्याची घोषणा सुद्धा केली व कार्यकर्त्यांना ताकद देणार असल्याचे सांगून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुर्ण ताकतीने लढण्याचे जाहिर केले.
यावेळी उपाध्यक्ष भोस म्हणाले विरोधकांनी कारखान्यात येण्यासाठी खुप धडपड केली. ज्यांना बापूंनी मोठे केले तेच नागवडे कुटुंबास रूतले. सर्वसामान्य माणूस दारात आला तर कोणत्या पक्षाचा कोणत्या गटाचा आहे हे न पाहता कामे केली म्हणून ऊद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्ते मोठ्या फरकाने आपल्या उमेदवारांना निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे म्हणाले की, तालुक्याच्या जडणघडणीत नागवडे बापुंचा सिंहाचा वाटा आहे व बापुंचे विचार समाजात रूजवयाचे असल्यास तालुक्याला बापुंच्या विचाराचा प्रतिनिधी ऊद्याच्या काळात विधानसभेत पाठवावा लागेल. या निवडणुकीत सर्व राज्याचे लक्ष लागून होते पण नागवडे बापुंच्या कामाची पावती म्हणून सभासदांनी कारखाना राजेंद्र नागवडे यांना पुन्हा मिळवून दिला म्हणून आलेख हा चढता असावा, चांगले काम करून प्रत्येक निवडणुकीत यश संपादन करा. राज्याचे महसूल मंत्री ना बाळासाहेब थोरात सदैव नागवडे कुटुंबाच्या पाठीशी आहेत व पुढे ही राहतील असा शब्द वाफारे यांनी भाषणात दिला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाऊसाहेब काळे यांनी केले तर आभार गंगाराम दरेकर यांनी मानले. प्रास्ताविक नवनिर्वाचित संचालक प्रशांत दरेकर यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांसह हिरडगाव परिसरातील सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या