आडुळ येथे विषारी औषध प्राशन करून युवकाची आत्महत्या


पाचोड/ विजय चिडे : मद्यपान करून एका अठ्ठाविस वर्षीय युवकाने विषारी किटनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या दरम्यान घडली आहे. वामन रोहिदास राठोड (रा.आडुळ तांडा ता.पैठण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

अधिक माहीती अशी की, पैठण तालुक्यातील आडूळ खुर्द येथील बिरोबा मंदिच्या शेजारी असणाऱ्या पाझर तलावा शेजारी एकाने विषारी औषध प्राशन केल्याचे कांबी हादगाव ते पिंप्रीराजा येथे पायी दिंडीने जात असलेल्या वारकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती आडूळ खुर्द येथील पोलीस पाटील आप्पाराव भावले यांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना आडुळ तांडा येथील वामन राठोड हा युवक असल्याचे दिसून आले.

वामन हा सकाळी कुणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडला होता. दुसऱ्याची मोटारसायकल घेऊन वामन बिरोबा मंदीराजवळ गेला होता. वामन राठोड जवळ विषारी औषधाची बाटली व एक देशी दारूची बाटली पडलेली होती. मात्र वामन यांनी विषारी औषध प्राशन केल्याची खळबळ सर्वत्र उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवशे यांच्यासह बिट जमादार उबाळे घटनास्थळी पाहणी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र आडूळ परीसरात पंधरा दिवसात दोन घटना सम घडल्यामुळे परीसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या