नगर मनमाड रस्ता ते स्टेशन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करताना माजी नगराध्यक्षा डॉ सौ उषाताई तनपुरे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उंडे, प्रभाकर म्हसे, राहुल शेटे, अशोक आहेर आदि.

राहुरी शहर/अशोक मंडलिक : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला हा रस्ता म्हणजे शहराचे प्रवेशद्वार असलेला व शहराचे सौंदर्यात भर घालणारा रस्ता म्हणून या रस्त्याची ओळख भविष्यात होणार आहे. ठेकेदारांनी या रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे करावे असे नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा डॉ सौ. उषाताई तनपुरे यांनी सांगितले.

नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या केंद्रीय रस्ते निधी योजनेतील पाण्याची टाकी (नगर मनमाड रस्ता ते स्टेशन रोड ते मांजरी ) या 3 कोटी 45 लाख 89 हजार 218 रुपये किमतीच्या रस्त्याचे काम व सौंदर्यकरण कामाचे भूमिपूजन समारंभ माजी नगराध्यक्षा डॉ सौ उषाताई तनपुरे यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष अनिल कासार यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी क्लबच्या रक्त पेढी जवळ संपन्न झाला. कार्यक्रम माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे हभप प्रभाकर महाराज म्हसे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष के पी वडीतके, वकील संघटनेचे अध्यक्ष राहुल शेटे, सूर्यभान म्हसे, बाळासाहेब उंडे, विठ्ठल विरकर, पटेल मास्तर, अरुण विठ्ठल तनपुरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

डॉ सौ. तनपुरे या आपल्या भाषणात म्हणाल्या की, तालुक्यातुन नगर मनमाड रस्त्याला जोडणाऱ्या राहुरी ते मांजरी व्हाया स्टेशन रोड नाका नं 5 मार्गे जाणाऱ्या या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण व्हावे यासाठी मी नगराध्यक्ष व श्रीमती चंद्रभागाबाई गीताराम तनपुरे या नगरसेविका असताना एकनाथ तनपुरे व आम्ही खूप दिवस प्रयत्नशील होतो. पण आज हा रस्ता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अगदी अल्पवधीत या रस्त्यास मंजुरी आणून रस्त्यासाठी 3 कोटी 45 लाख 89 हजार रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने रस्त्याची सुधारणा व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आज होत आहे. या रस्त्याचे काम जेव्हा सुरु झाले, त्यावेळी रस्त्याचे कडेला असलेली अनेक जुनी झाडें तोडण्यात आल्याने हा भाग आज जरी भकास वाटत असला तरी भविष्यात या रस्त्याच्या कडेला दस पट झाडे लावण्यात येतील असा शब्द या कामाचे ठेकेदार आर एच दरे यांनी दिला असून ते लिंब, वड, पिंपळ आदि वृक्षांची लागवड करणार आहेत. ठेकेदारांनी या रस्त्याचे काम दर्जेदार करावे असे आवाहन यावेळी केले.
     या रस्त्याचे भूमिपूजन कामासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित राहणार होते. परंतु अचानक मुंबई येथे बैठक व अर्थसंकल्प अधिवेशन सुरु असल्याने येऊ शकले नाही, असा खुलासा डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांनी केला.
ठेकेदार दिपक दरे यांनी आपल्या भाषणात नगर मनमाड रस्ता ते स्टेशन रोड नाका नं 5 पर्यंतच्या रस्त्याचे काम निश्चित अतिशय चांगल्या दर्जाचे केले जाईल तसेच जी झाडे तोडली आहेत. त्याबद्दल्यात झाडे रस्त्याचे दुतर्फा लावली जातील असा शब्द दिला आहे. रस्त्याचे काम सुरु करतानाच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व परिवाराने या बाबत मौलिक सूचना दिल्या आहे.

यावेळी नगरसेवक नंदकुमार तनपुरे, शहाजी जाधव, अशोक आहेर, गजानन सातभाई, संजय साळवे, एकनाथ तनपुरे, राजेंद्र बोरकर, अशोक कदम, पांडुरंग उदावंत, राजेश कदम, गणेश धाडगे, प्रवीण कदम, मुळा प्रवराचे माजी संचालक अय्युब पठाण, राहुरी सेवा संस्थेचे चेअरमन बाबासाहेब तनपुरे, आबासाहेब वाळुंज, कान्हूजी तारडे, कांता तनपुरे, डॉ संकेत दुधाडे, बाळासाहेब पेरणे, अयुब शेख, प्रवीण सुराणा, रोहिदास अडागळे, ज्ञानेश्वर जगधने, सौरभ उंडे, केतन पोपळघट आदि उपस्थित होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी प्रास्तविक व आभार मानले.