कॉंग्रेस प्रदेश सचिव कोळपकर यांची कोल्हार येथे भेट

राहुरी / बाळकृष्ण भोसले - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव तथा अहमदनगर जिल्हा काँग्रेस पक्ष निरीक्षक विनोद कोळपकर हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले असता राहुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब आढाव पाटील हे कोळपकर यांच्या समवेत राहुरी तालुक्यातील काँग्रेस कमिटीला ठिकठिकाणी भेटी दिल्या. या दरम्यान कोल्हार खुर्द काँग्रेस कमिटीच्या वतीने विनोद कोळपकर यांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला.

यावेळी कोळपकर म्हणाले की, अखिल भारतीय इंदिरा काँग्रेस पक्षाची डिजिटल सभासद नोंदणी अभियान चालू आहे. त्यात काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य चे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. अडचणी आल्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यासाठी कार्यकर्त्यांच्या मागे सदैव उभी राहिल. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे सदैव उभे असतात. तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव यांनी काँग्रेस पदाधिकारी यांना डिजिटल सभासद नोंदणी अभियान बाबत मार्गदर्शन केले व तालुका सरचिटणीस संजय भोसले यांनी आभार मानले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुरेश पाटील शिरसाठ, उपाध्यक्ष रखमाजी क्षीरसागर, अनिल पाटील शिरसाठ, नानाभाऊ शिरसाठ, राहुरी तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब सगळगिळे, रमेश शिरसाठ, आल्फोन्स भोसले, जय बाबाचे पत्रकार वसंत भोसले, गोरक्ष आनाप, सचिन शिंदे, महिपती शिरसाठ, भाऊसाहेब राऊत, भागवत शिरसाठ आदि प्रमुख काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या