देवळाली प्रवरा पालिकेच्या पाणी योजनेवरून खाजगी उद्योजकाला वीज जोडणी देवू नये - भाऊसाहेब पगारे

राहुरी / बाळकृष्ण भोसले - देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या पिण्याच्या पाणी योजना ठिकाणावरून शिंदे डेव्हलपर्स कंपनी वीज जोडणी करू पाहत असून सदर विद्युत जोडणी करून देऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी दिला आहे.

मुख्याधिकारी अजित निकत यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, आपल्या नगरपरिषदेने मुळा धरणांतून पिण्याची पाण्यासाठी पाईपलाईन आणलेली असून, त्याठिकाणी मोठी पाण्याची टाकी उभारलेली आहे. त्याठिकाणाहून पूर्ण नगरपरिषदेत हद्दीत पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा व्हावा या हेतूने नगरपरिषदेने स्वखर्चातून लाखो रुपये खर्च करून एक्सप्रेस विद्युत पुरवठा नेलेला आहे. त्यामुळे नगर परिषदेतील हद्दीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. परंतु त्या विद्युत पुरवठ्यातून पाण्याची टाकी ताहाराबाद रोड याठिकाणाहून शिंदे डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनी ( सेसकॉन ) आपल्या कंन्ट्रक्शन कामकाजासाठी विद्युत जोडणी करण्याच्या विचारात आहे. परंतु तसे झाल्यास आपल्या नगरपरिषदेला त्या विद्युत लाईनचा मेंटनन्स वाढून कमी दाबाने वीज मिळेल. व त्यांचा परिणाम नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर होणार आहे. मेंटनन्स करण्यास विलंब लागतो. त्यामुळे नागरिकानां पिण्याचे पाणी वेळेत न मिळाल्यास पिण्याच्या पाण्यासाठी भंटकती करावी लागेल. म्हणून आपण आपल्या नगरपरिषदेच्या विद्युत वाहिनीतुन सदर कंपनीस विद्युत जोडणी करुन देवू नये. यापूर्वी या कंपनीस ग्रामपंचायत गुहा यांनी ग्रामसभेचा ठराव घेवून विद्युत पुरवठ्यासाठी कुठल्याही प्रकारचे ना हरकत दाखले दिलेले नाही. म्हणून ती कंपनी आपल्या नगरपालिका हद्दीत येवून विद्युत जोडणी करण्याच्या विचारात आहे.

तरी त्या कंपनीस विद्युत जोडणी करु देवून नये. व कुठल्याही प्रकारचे ना हरकत दाखले देवू नये दिल्यास नगरपालिकेसमोर तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल. नगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असा इशारा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या