स्मार्ट सिटी रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचे दोन महिन्यांपासून साखळी उपोषण

अहमदनगर/ जावेद शेख : शेतकरी बचाव संघर्ष समिती धोत्रे, बापतरा, लाखगंगा, गंगापूर, पुरणगाव येथील शेतकऱ्यांनी ६५ दिवसांपासून साखळी उपोषण पुकारले आहे. ते उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकर न्याय मिळण्यासाठी अहमदनगर शिक्षक भारती संघटनेचा जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा सचिव महेश पाडेकर यांनी दिली.

मुंबई नागपुर समृद्धी महामार्ग लगत कृषी समृद्धी केंद्र होण्यासाठी झालेल्या सर्वेक्षणात धोत्रे, बाबतारा, लाखगंगा, पुरणगाव येथील शेतकऱ्यांच्या सुपीक, बागायती जमिनी जात असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल दोन महिन्यापासून साखळी उपोषण सुरू केले आहे. तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही. त्यांना न्याय मिळण्यासाठी शासन मान्य शिक्षक भारती संघटना शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे महेश पाडेकर यांनी सांगितले.

या प्रसंगी संजय चव्हाण, फकिरा वैद्य, नारायण शिंदे, भगवान कांबळे, कोपरगाव काँग्रेसचे उपाध्यक्ष विष्णू पाडेकर, कचेश्वर घाटे, साहेबराव गागरे, आदर्श पाडेकर आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.