अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी न्यायालयात लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दिवाणी ७५१ पैकी १०५ प्रकरणे निकाली निघाली, फौजदारी स्वरूपाचे ६१३ पैकी ५६ प्रकरण निकाली निघून ५५.६४.७३० इतका वसूल झाला, बँकांचे दाखल पूर्व ७७५ पैकी ९ निकाली निघुन ११,७६,४०० इतका वसूल झाला प्रलंबित प्रकरणे निकाली निघाली असून अनेक बँका, व विविध प्रकारच्या पतसंस्था यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन एम. एस. सी.बी.चे ९८२ की १९ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्याचा वसूल १६.०१,१४०/- झाला, तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणी पट्टी चे एकूण २५०० पैकी १२३१ निकाली निघून त्या प्रकरणातून एकुण १४,७८,४८९/-रुपये वसूल झाला. सर्व प्रकरणातून एकूण वसूल २.८१,६०२९ इतका वसूल झाला.
सदर लोकन्यायालयाचे कामकाज तीन पॅनल मध्ये चालले. पॅनल न.१ मध्ये राहुरी न्यायालयातील मुख्य न्यायाधीश श्रीमती असावरी वाडकर मॅडम या होत्या, पंच म्हणून ॲड.स्वाती सांगळे, सुरेखा कुलकर्णी या होत्या. त्यांना मदतनीस म्हणून कोर्टातील नेमणूक करण्यात आलेला स्टॉफ होता. पॅनल न.२ मध्ये सह.न्यायाधीश श्रीमती सुजाता शिंदे मॅडम या होत्या, पंच म्हणून ॲड.अनिता तोडमल व ॲड.अमोल पानंसबळ त्यांना मदतनीस म्हणून कोर्टातील नेमणूक करण्यात आलेला स्टॉफ होता. पॅनल न.३ मध्ये सह.न्यायाधीश कू.माया मथुरे मॅडम या होत्या, पंच म्हणून ॲड.बाळासाहेब बाचकर व ॲड.मनीषा आढाव यांनी काम पाहिले तर त्यांना मदतनीस म्हणून कोर्टातील नेमणूक करण्यात आलेला स्टॉफ होता.
या वर्षाचे पहिलेच लोक अदालत यशस्वी करण्यासाठी राहुरी तालुका बार असोसिएशनचे सर्वच आजी माजी पदाधिकारी व सर्व सदस्यांच्या सहकार्याने तसेच कोर्टातील स्टॉफ यांनी महत्त्वाची भूमिका बजावून सहकार्य केले.
0 टिप्पण्या