श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : भविष्य निर्वाह निधीच्या गौहत्ती येथे झालेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी चे मिटींग मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी वर दिल्या जाणाऱ्या व्याजदरात कपात करण्यात आलेली असून गेल्या ४० वर्षातील सर्वात कमी व्याज देण्याची शिफारस करण्यात आली आहे.मागील वर्षी व्याज दर ८:५ टक्के होता तर चालू वर्षी तो ८:१ टक्के करण्यात आला आहे.
सेवा निवृत्त कामगार पेन्शन वाढीसाठी गेली अनेक वर्षे सातत्याने आंदोलन करुन पेन्शन वाढीसाठी मागणी करत आहेत. राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांचे नेतृत्वाखाली सातत्याने आंदोलन व पाठपुरावा चालू आहे. पंतप्रधानांसमवेत दोन वेळा चर्चा झाली असुन अर्थ सचिव व मुख्य भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांचे समवेत दि.८ मार्चला त्रिपक्षीय बैठक झाली. तसेच दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी दिल्ली येथे झालेल्या सीबीटी मिटींग चे समोर कमांडर साहेबांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सल्लागार डॉ.पी.एन.पाटील यांचे नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली होती. त्यामुळे केंद्रीय कामगार मंत्री यांनी सदर मिटींगमध्ये एक ॲडव्हाॅक कमिटी नेमली होती व तिला आपला अहवाल पूढील मिटींगमध्ये ठेवण्याचे सुचविले होते.
त्याप्रमाणे चालू मिटींगमध्ये अहवाल ठेवण्यात आला असून त्यावर बरीच चर्चा झालेली आहे. चर्चेनंतर कामगार मंत्री यांनी हा विषय दिर्घकालीन परिणाम करणारा असुन याबाबत काही अर्थ तज्ञांशी विचारविनिमय करून निर्णय घेवू असे मिटींग मध्ये सांगितले आहे. अर्थात यात त्यांचा वेळ काढूपणा असला तरी आपले सततचे पाठपुराव्यामुळे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. आपणास दरमहा रु.७५०० व निगडित महागाई भत्ता व इतर मागण्या मान्य होईपर्यंत आपला लढा चालूच राहणार आहे. अशी माहिती इपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती पश्चिम क्षेत्र संघटक सुभाष पोखरकर यांनी दिली
0 टिप्पण्या