वावरथ व ब्राह्मणी येथे विविध दाखल्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन

अहमदनगर/ जावेद शेख : तालुक्यातील वावरथ व ब्राम्हणी येथील सर्व सामान्य नागरिकांना दाखले घेण्यासाठी राहुरी येथे हेलपाटे मारावे लागूनही वेळेवर दाखले मिळत नसल्याने सदर दाखले त्वरित मिळावे यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वावरथ येथे ना. प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आधार कार्ड दुरुस्ती, पंतप्रधान विमा योजना, अटल पेन्शन योजना, जातीचे दाखले, कृषी संबंधित योजना, पॅन कार्ड अशा विविध प्रकारच्या योजनांचे दाखले मिळण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 54 नागरिकांना दाखले जागेवर देण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती अण्णासाहेब सोडणार, सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, उपसरपंच रावसाहेब केदार, ग्रामपंचायत सदस्य धोंडिभाऊ बाचकर, सखाराम जाधव, आप्पासाहेब बाचकर, दगडू बाचकर, बाबासाहेब जाधव, अण्णासाहेब बाचकर, दत्ता पेरणे, करपे पाटील, तुपे सर, प्रिया पंडित मॅडम व महिला वर्ग उपस्थित होते.

याच प्रकारे ब्राह्मणी तेथेही शिबीर आयोजित करण्यात येऊन तिथे 48 नागरिकांना जागेवर आधार कार्ड दुरुस्ती, पंतप्रधान विमा योजना, अटल पेन्शन योजना, जातीचे दाखले, कृषी संबंधित योजना, पॅन कार्ड अशा विविध प्रकारचे दाखले जागेवर देण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्र बानकर, डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक भारत तारडे, माणिक तारडे, विठ्ठलराव मोकाटे गुरुजी, सोमनाथ हापसे, सचिन ठुबे, रंगनाथ मोकाटे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या