देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे महिला ग्रामसंघाची स्थापना, हळदि कुंकू समारंभ, विविध स्पर्धा व महिला बचत गट मेळावा सोमवारी संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उमेद अभियानाचे तालुका समन्वयक प्रवीण गायकवाड होते तर अध्यक्षस्थानी सौ.लता बबन कोबरणे या होत्या. व्यासपीठावर बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कुलचे प्रा.दत्तात्रय वाणी, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, प्रभाग समन्वयक अशोक खोमणे, राणी पगारे, श्रीमती प्रजापती, डॉ. सौ. वैरागर, माधुरी कोबरणे, रेखा कोबरणे, स्वाती कोबरणे, सोनाली कोबरणे, सरपंच सौ.शोभाताई भनगडे आदी उपस्थित होते.
भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी सांगितले की, गणेगाव येथे बचत गटांच्या माध्यमातून ग्राम संघ कार्यालय सुरू करण्यात आले असून यापुढे शासनाच्या विविध प्रकारच्या योजना राबवून महिला बचत गटांना कार्य करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. प्रा.दत्तात्रय वाणी यांनी गावातील सर्व उपक्रमांचे कौतुक करत गावामध्ये नेत्रदीपक कार्य सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी महिला बचत गटांच्या महिलांना रांगोळी स्पर्धा, पाक कला, विविध कलागुण याबाबत बक्षीस वितरण करण्यात आले. प्रास्तविक जि. प.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोर्डे यांनी केले.
कार्यक्रमास कल्याणी कोबरने, शांता कोबरने, कल्पना कोबरने, पुष्पा कोबरने, छाया कोबरने, मंदा भनगडे, सविता कोबरने, मनीषा कोबरने, रुपाली कोबरने, ज्योती खाडे, रुपाली उ-हे, पोपट कोबरने, बाळासाहेब कोबरने, मंजाबापु कोबरने, विलास कोबरने, गंगाधर कोबरने, प्रमोद कोबरने, शिक्षक गुंजाळ, भालेराव आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या