◾नसता शिक्षण विभागाच्या दालनात वर्ग भरणार
◾शालेय समितीचा इशारा
विलास लाटे/ पैठण : पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील जिल्हा परिषद प्रशालेत उर्दु माध्यमाच्या शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. यामुळे उर्दु माध्यमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हि रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी नसता जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांच्या दालनात वर्ग भरविण्यात येतील असा इशारा शालेय समितीच्या अध्यक्षा परवीन रफिक महेलेदार यांनी नुकताच शिक्षणाधिकारी यांना मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०१४ पासून ढोरकीन येथील जिल्हा परिषद प्रशालेत उर्दु माध्यमाचे इयत्ता ८ वी ते १० पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. सन २०१९-२० या वर्षी एकुण १७५ विद्यार्थी संख्या आहे. त्यात विशेषतः मुलींची संख्या अधिक आहे. त्याकरिता किमान ३ पदे आवश्यक आहे. २०१८-१९ मधील संच मान्येतेत २ पदे होते. मात्र २०१९-२० संच मान्यतामध्ये उर्दु माध्यमाचे एकही पद मंजूर करण्यात आले नाही. हि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भुमिकेच्या दृष्टीने अन्यायकारक बाब आहे. पद मंजूर नसल्याने शिक्षका अभावी उर्दु माध्यमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. २०१९-२० या वर्षातील संच मान्यतामध्ये दुरुस्ती करून उर्दु माध्यमातील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची पदे मंजूर करुन शिक्षकांची नियुक्ती करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नसता ढोरकीन येथील ग्रामस्थांकडून या उर्दु माध्यमात शिक्षण घेत असलेल्या मुलांची शाळा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात भरविली जाईल, असा इशारा शालेय समितीच्या अध्यक्षा परवीन रफिक महेलेदार यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना मेलद्वारे निवेदन पाठवून दिला आहे.
0 टिप्पण्या