सदस्य आणि अध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही पद्धतीने घेण्यात आली. पुनर्गठित शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रामेश्वर अशोक निर्मळ यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी दत्ता बापूराव काळे यांची निवड करण्यात आली असून सीमा बाळासाहेब उबाळे, ज्योती अशोक भांगळे, योगिता अरुण तांबे, राणी जगदीश निर्मळ, मनीषा शरद निर्मळ,ज्ञमंगल संजय निर्मळ, लक्ष्मण विठ्ठल निर्मळ, रामेश्वर विष्णू वाहुळे, संदीप रामनाथ नेहाले तर शिक्षणप्रेमी नागरिक सदस्यपदी विलास गोलांडे यांची निवड करण्यात आली.
शिक्षक प्रतिनिधी सदस्यपदी म्हणून रामनाथ मोहिते यांची निवड करण्यात आली. सचिव मंगेश कुमार अंबिलवादे यांनी पालक सभेला संबोधित केले निवडणुकीचे निकष सर्वांना समजावून सांगितले. निवडीनंतर सर्व सदस्य, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रदीप मुंगसे, आबासाहेब टकले, भरत सानप, कांचन लेंभे, वर्षा नवथर ,सरोज हांडे, सुरेखा काळे, सारिका सूर्यवंशी, भारती शेवाळे यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या