संगमनेर/ बाळासाहेब भोर : ऐतिहासिक परंपरेने नटलेल्या व नैसर्गिक वारसा लाभलेल्या स्वराज्य संकल्पभूमी पेमगिरीत आज कोविडचे सर्व शासकीय नियम पाळून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

पेमगिरी गावचे देशसेवेतील निवृत्त अधिकारी एन. एन. डुबे व सध्या कर्तव्यावर असलेले शुभम पांढरे, दर्शन दिक्षत तसेच लोहमार्ग पोलीस दलात कार्यरत असलेली शीतल पांढरे यांचा शहागड युवा प्रतिष्ठान व ग्रामपंचायत पेमगिरीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी पेमगिरी गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तलाठी मॅडम, ग्रामसेवक, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक, शहागड युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.