कोल्हार महाविद्यालयात जागतिक युवा दिन साजरा, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद अनमोल रत्ने - प्रा. येवले


राहुरी / बाळकृष्ण भोसले
:‘राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले आणी त्यांच्या हातून स्वराज्याची गाथा रचली. युगपुरुष स्वामी विवेकानंद यांनी‘जोपर्यंत ध्येयाप्रती पोहोचणार नाही तोपर्यंत थाांबू नका’असा संदेश देऊन यवुकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत केले. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांसारखी अनमोल रत्ने महाराष्ट्राच्या भुमीत जन्मली हे या महाराष्ट्र भुमीचे भाग्य आहे’असे प्रतिपादन कोल्हार महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रमुख प्रा.उत्तम येवले यांंनी केले.

कोल्हार येथील पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व उत्सव समितीच्या वतीने जागृती युवा दिन साजरा करण्यात आला, प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे होते.

आपल्या प्रमुख भाषणात येवले यांनी राजमाता जिजाऊ आणी स्वामी विवेकानंद कार्यकर्तुत्वाचा आढावा घेतला. त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या विकासासाठी कसे प्रेरणादायी आहे हेही पटवनू दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे आपल्या भाषणातून छत्रपती शिवरायांसारखे पुन्हा जन्मण्यासाठी होण्यासाठी प्रत्येक घरात राजमाता जिजाऊ जन्माल्या याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्सव समितीच्या अध्यक्षा प्राध्यापिका तांबे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. डॉ. राजेंद्र वडमारे यांनी केले. आभार प्रा. मधकुर वाणी यांनी मानले. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून घेतलेल्या या कार्यक्रमासाठी राष्टीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. प्रवीण तुपे, प्रा. प्रकाश पुलाटे महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या