राहुरी शहर/ अशोक मंडलिक - राहुरी येथे मराठा बहुऊद्देशिय संस्थेच्या कार्यालयात सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त जिजाऊंच्या लेकी समुहाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी राजश्री घाडगे, वर्षा लांबे, ज्योती नालकर, दिपाली अडसुरे, जयश्री वाबळे, रितु चाकोते, संगिता कमीटे, रुपाली गाजरे, माया देसाई, श्रध्दा मोरे, सुवर्णा बोर्डे, विमल खरात, कल्पना गायकवाड आदी उपस्थित होत्या.
या प्रसंगी राजश्री घाडगे म्हणाल्या की, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा आदर्श घेवून सर्व महिला भगिनींनी कुटुंब सांभाळतांना मुलींना प्राधान्याने शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे आहे. पूर्वी लग्न करुन देण्यासाठी वयाचे कुठलेही निर्बध नव्हते. मुलींचे लहान वयातच लग्न करुन दिल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत असत. परंतु मुलींना शिक्षणात प्राधान्य दिल्याने व सरकारने लग्नाचे वय १८ वर्ष करण्याचा कायदा केल्यामुळे स्त्रीया स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत.
नुकताच सकारने मुलींच्या लग्नाचे वय १८ वरुन २१ वर्ष बालविवाह प्रतिबंधक कायदा केला आहे. हे सर्व शक्य झाले सावित्रीमाई फुले यांच्या प्रयत्नांन मुळे, यामुळे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा आदर्श प्रत्येक जिजाऊंच्या लेकीने पुढे चालवावा असे सौ.राजश्री घाडगे म्हणाल्या.
0 टिप्पण्या