राहुरीत गावठी कट्यातुन गोळीबार; तरूण ठार

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : राहुरी तालुक्यातील गुंजाळे परिसरामध्ये टेलरच्या दुकानात टेलरला गावठी कट्टा दाखवत असताना अचानक गावठी कट्यातून गोळीबार होऊन प्रदीप एकनाथ पागिरे (वय २५) वर्षीय अविवाहित तरूण ठार झाल्याची घडना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात होता की गोळी घालुन ठार करण्यात आले. या बाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे. माञ राहुरी पोलिसांनी गोळीबारातून तरुणाचा मृत्यू झालेला असताना आकस्मत मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेतील संशयित आरोपी म्हणून एका तरुणास ताब्यात घेतले आहे.

याबाबत समजलेली माहीती अशी की, आज सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान गुंजाळे (ता.राहुरी) येथील टेलरींग काम करणारा प्रदीप एकनाथ पागिरे हा तरूण आपल्या दुकानात काम करत असताना त्याचा एक मिञ दुकानात आला. प्रदीप यास गावठी कट्टा दाखवत असताना गावठी कट्ट्यातून अचानक गोळी सुटुन मोठा आवाज झाला. सदर आवाजाच्या दिशेने ग्रामस्थ तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी दुकानाकडे धाव घेतली. समोरचे दुष्य पाहिले असता प्रदिपच्या छातीत गोळी घुसून तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.

प्रदीप यास तात्काळ नगर येथिल जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र त्या उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सुञांनी सांगितले. गावठी कट्टा दाखवत असताना अचानक गोळी सुटली की त्याच्या मिञाने प्रदीप याच्यावर गोळीबार केला याची माहिती मिळू शकली नाही. गोळीबार प्रकरणी एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती समजताच अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, श्रीरामपुर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञ यांनी श्वान पथकाच्या मदतीने आरोपीचा माग शोधण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावरील गावठी कट्ट्यावरील ठसे ठसेतज्ञ पथकाने घेतले असुन त्या अधारे ताब्यात घेतलेला आरोपीचे हाताचे ठसे मिळते जुळते आहे का?याची माहिती घेतली.

दरम्यान मृत तरुण व त्याचा मित्र हा सकाळी सकाळी आपल्या दुकानात गावठी कट्टा पहात असताना त्यातून  अचानक गोळी सुटून ती गोळी छातीत घुसून त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याची चर्चा घटनास्थळी उपस्थित नागरीक करीत होते. माञ पोलिसांनी गावठी कट्ट्यातून गोळी लागुन प्रदीप याचा मृत्यू झालेला असतानाही आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणाची माहिती प्रसारमाध्यमा पासुन लपुन ठेवण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या