हरिगांव शाळेस माजी विद्यार्थ्यांकडून नेत्रदीपक कमान

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम बेलापूर कंपनी हायस्कूल मध्ये संपन्न झाला. ध्वजारोहण करण्याचा मान शाळेचे माजी विद्यार्थी तसेच अतिमहत्वाच्या भारतीय सुरक्षा व्यवस्थेमध्ये सेवा करुन सेनादलातील निवृत्त झालेले मेजर अनिल रावसाहेब कारभार यांना मिळाला. श्री.कारभार हे १९८६ बॅच चे विद्यार्थी आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.बाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून १९८६ बॅचच्या विद्यार्थ्यांनी हरिगांव शाळेसाठी भव्य दिव्य अशी नेत्रदिपक कमान बसवून दिली. त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेसाठी एक सरकते गेट बसवून दिले. विद्यार्थ्यांनी स्वतः चाळीस हजार रुपये जमुन ही रक्कम खर्च केली. या कार्यक्रमात त्याच बॅचच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि कमान व गेट समर्पण सोहळा असा दुग्धशर्करा योग जुळून आला.
यासाठी प्रकाश शिंदे, अभिजीत कुलकर्णी, अनिल कारभार, बाळू वेताळ, लक्ष्मण जायभाये, अनिल सुकासे, निसार शेख, विजय शिंदे, विलास भालदंड, राजू दळवी, संजय सोमोसे, लता चोरमल, उषा भाकरे, इतर विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या बॅचच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी खास श्रीखंड गोळ्यांची पाकिटे वाटण्यात आली. जी यापूर्वी वार्षिक स्नेह संमेलन प्रसंगी वाटप करायचे शाळेचे माजी लिपीक श्री गंधे यांनी मुलांना खाऊ दिला. यापुढेही शाळेसाठी आवश्यक लागणारी मदत करण्याची सहमती त्यांनी दर्शविली. या बॅचच्या आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व पाहुण्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. खास बाब म्हणजे कोणत्याही वेळेला आपल्या शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले सर्वतोपरी सहकार्य करणारे आपल्या शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी श्री. राजू जाधव यांचाही याप्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला.

बापूसाहेब पटारे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले, याप्रसंगी संस्थेचे सहसचिव जयंतराव चौधरी, शाळेचे माजी मुख्याध्यापक काळे, मुख्याध्यापिका सौ. आदिक/ पटारे, आढाव, श्रीरामपूर पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी मोहन शिंदे, गंधे, हरिगावचे माजी उपसरपंच श्री.रसूलभाई पठाण, अविनाश काळे, संजू नरोडे, फोटो ग्राफर संभाजी चेडे आदि उपस्थित होते. कमान व सरकते गेट बनविण्याचे काम आदिनाथ जंगले व त्यांचे सहकारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दुशिंग, वमने, गवारेे, सौ गलांडेे, सौ गायकवाड, सौ डांगोरकर, पठाण, यादव, राजू जाधव, प्राथमिक शाळेचे श्री कर्डिले सर आदींनी सहकार्य केले. सदर विद्यार्थ्यांचे खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या चेअरमन श्रीमती पुष्पलता आदिक, सचिव अविनाश आदिक, सहसचिव जयंत चौधरी, श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष कु अनुराधा आदिक, शालेय समितीचे अध्यक्ष नितीन पवार, संस्थेचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या