राहुरी शहर/ अशोक मंडलिक : रब्बी हंगाम संपत आला तरी पहिले रोटेशन न सोडल्याने प्रहार जनशक्ती पक्षांकडुन रोटेशन सोडण्यासाठी सतत प्रयत्न केले जात होते, अखेर या प्रयत्नाला दि. 18 जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी पाणी सोडल्याने यश आले आहे, नाहीतर काहींनी पाणी सोडा या ऐवजी पाणी वापर संस्था बरखास्त करा अशा चुकीच्या मागण्या केल्या होत्या असे सुरेशराव लांबे म्हणाले आहे.
गेल्या दोन वर्षांपासुन अतिवृष्टीने महाराष्ट्रातील सर्व तलाव व धरणे पुर्ण क्षमतेने भरलेली असुन पाट पाण्याचे योग्य नियोजनाअभावी धरणात पाणी असुन देखील शेतकऱ्यांचे कांदा, गहु, ऊस व मुक्या जनावरांचे चारा पिके जळुन खाक झालेली आहेत. मुळा उजवा कॅनल हा राहुरी, नेवासा, शेवगाव व पाथर्डी या चार तालुक्यातील कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी फारच मोठे वरदान आहे, या कार्यक्षेत्रातील सर्व प्रस्थापित पुढारी कारखानदार आहेत व त्यातील दोन पाणीदार आमदार मंत्री देखील आहेत. या लोकप्रतिनिधीं कडुन निवडणुकीत नेहमीच शेतकऱ्यांबद्दल कळवळा असतो. मात्र संपुर्ण रब्बी हंगाम संपत आला तरी त्यांनी पाटपाण्याच्या योग्य नियोजन न केल्यामुळे धरणात पाणी असुन देखील शेतकऱ्यांचे पाण्याअभावी मोठे नुकसान होत आहे. या सर्व गोष्टींना विद्यमान सरकार मधील आमदार मंत्री जबाबदार आहेत.
त्यातच विहीर बोअरवेल याला जे थोडेफार पाणी आहे, ते विजे अभावी बंद आहे. महावितरणने थकबाकीच्या नावाखाली चालु वीज पुरवठा बंद करुन शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली आहे. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातुन राष्ट्रवादीचा आमदार अनपेक्षित निवडुन आले आहेत. त्यातच ते अनपेक्षित सत्ताधारी सरकार मधे सहभागी आहेत, त्यातच ते अनपेक्षित चार पाच खात्याचे मंत्री झालेत. हे सर्व अनपेक्षित मिळाले तरी त्यांचे अजुनही समाधान होईना. ते तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नावर लक्ष देण्याचे सोडुन ते नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळविण्यात दंग झाले आहेत. आहो ना. प्राजक्त तनपुरे आतातरी समाधानी रहा व लोकांनी ज्या आशेने तुम्हाला मते दिली, आता त्यांना समाधानी करा. असा सल्ला वजा आरोप प्रहार जन शक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केले आहे. त्या प्रयत्नाला अखेर काल दि. 18 जानेवारी 2022 वार मंगळवार रोजी सायंकाळी यश आले. कॅनला पाणी सोडले आहे.
नगराध्यक्ष पदावर असताना व राज्य सरकार सत्तेत नसताना प्राजक्त तनपुरे ज्या मागण्या करत होते, त्याच मागण्या आता ना. प्राजक्त तनपुरेंनी पुर्ण कराव्यात असे सुरेशराव लांबे म्हणाले. कॅनलला पाणी आहे तोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य दाबाने कमीतकमी 8 तास ते जास्तीत जास्त 12 ते 16 तास विज पुरवठा सुरळीत व्हावा, शेतकऱ्यांकडे जोपर्यंत पैसे येत नाहीत, तोपर्यंत विज बिल भरणार नाहीत. कृषी मुल्य आयोग शेतीच्या उत्पादन खर्चात विजबील खर्च धरत नाही. त्यामुळे शेती पंपाला मोफत वीज पाहीजेत अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांसाठी प्राजक्त तनपुरे सतत करत होते. त्या मागण्या मागील लोकप्रतिनिधी व सरकारने मान्य केल्या नाहीत म्हणुन तनपुरेंना विधानपरिषदेत पाठवले. यांनी तर सर्व सामान्य जनतेच व शेतकऱ्यांच जास्तच डोक उठवलं असा प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी शेवटी व्यक्त केले.
0 टिप्पण्या