सावित्रीबाई फुले यांच्या त्यागातुनच महिला शिक्षणाचा मुहूर्त - मकासरे

राहुरी शहर / अशोक मंडलिक - आज ची महिला उच्च शिक्षीत होऊन उच्च पदावर पोहचली आहे. ते पद सावित्रीबाई फुले यांच्या त्यागमय जीवनातुनच सुरु झाले आहे. भारतातील पहिल्या महिला शिक्षक या सावित्रीबाई फुले याच आहेत, असे प्रतिपादन वंचितचे आप्पासाहेब मकासरे यांनी केले आहे.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व महिला आर्थिक विकास महामंडळ अंगिकृत प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्र राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून राहुरी नगरपरिषद चे नगरसेविका सौ.राधाताई साळवे हे होत्या. माविम चे राहुरी तालुका व्यवस्थापक यांनी उपस्थित मान्यवर व महिलांना कार्यक्रम विषयी माहिती देत माविम तर्फे राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमाचे थोडक्यात प्रस्ताविक केले.

वंचित युवा आघाडीचे अहमदनगर जिल्हा महासचिव आप्पासाहेब मकासरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली. बार्टी चे समतादूत एजाज पिरजादे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महिला च्या आरोग्याच्या दृष्टीने आज जयंती निमित्त हिमोग्लोबीन तपासणी चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे ज्ञानेश्वर इघे, सेंट्रल बँकेचे संजीव भोर, एचडीएफसी चे औताडे तसेच माविम सोबत जोडले गेलेल्या महिला बचत गटाचे अध्यक्ष, सचिव, सदस्या आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश अबुज यांनी केले तर आभार माविम च्या सहयोगनी सौ. कल्याणी पवळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माविम चे सहयोगनी सौ. योगिता चुंबलकर व लेखापाल उमेश खरात, स्वाती दानवे यांनी विशेष प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या