उंदीरगाव प्रगत बागायतदार सोसायटी चेअरमनपदी पडोळे, व्हा चेअरमन गुळवे


श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे
: जिल्हा सहकरी निवडणूक अधिकारी व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या आदेशानुसार आज दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी उंदिरंगाव प्रगत बागायतदार वि का सेवा संस्था मर्या, उंदिरंगाव ची चेअरमन व व्हा.चेअरमन निवड करण्यात आली.

सर्वानुमते चेअरमन पदी भाऊसाहेब मच्छिंद्र पा पडोळे तसेच व्हा चेअरमन पदी दत्तात्रय अण्णासाहेब पा गुळवे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचे मा.आ.भानुदास मुरकुटे, जिल्हा बँक चे संचालक करण ससाणे, शिर्डी संस्थान चे विश्वस्थ सचिन गुजर यांनी अभिनंदन केले.

या निवडी प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक राजेंद्र पाऊलबुद्धे, संस्थेचे मावळते चेअरमन शिवाजी भालदंड, मावळते व्हा चे. प्रकाश ताके, मच्छिंद्र आढाव, दिलीप गलांडे, पाराजी ताके, राजेंद्र घोडे, सुरेश शिंदे, गणेश पाऊलबुद्धे, पवन पाऊलबुद्धे तसेच संस्थेचे सचिव संदीप रोकडे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यलयातील संदीप कोठुळे यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या